मी जेव्हा जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना (वर्ग 1 ते 7) खो- खो, कबड्डी व क्रिकेट खूप खेळायचो. कारण आमच्या गावाकडे जवळपासच्या शाळा मिळून टुर्नामेंट भरवयचे. त्या टुर्नामेंट मध्ये आम्ही प्राथमिक व माध्यमिक (शाळेची टीम) सहभागी व्हायचे आणि जिंकायचे. तर आपण खो खो खेळाविषयी जाणून घेऊया.
     खोखो खेळामध्ये एका टीमची संख्या बारा असते. मुली असतील तरी बारा खेळाडू आणि मुलं असतील तरी बारा खेळाडू असतात.
     खो खो खेळाचा मैदान क्रिकेट खेळाचा मैदानापेक्षा लहान व कबड्डी खेळाच्या मैदानापेक्षा मोठा असतो. आयात आकाराचा असतो. दोन टोकावर मधे दोन खुंट असतात. त्या दोन खुंटाच्या मधे पाट्या असतात. हा खेळ दोन संघामध्ये होतो. जो संघ टॉस जिंकेल तो बसणार की खेळणार हे ठरवतो. एका टीमचे खेळाडू मैदानात त्या पाट्याच्या मध्ये बसलेले असतात व एकजण खुंटाजवळ उभा असतो आणि दुसऱ्या संघाचे तीन खेळाडू त्या बसलेल्या जवळ उभे असतात वेली काढण्यासाठी. बसलेले खेडाळू त्या तीन गड्यांना हात लाऊन आऊट करायचे असते ते आऊट झाल्यानंतर त्यांच्या टीम मधले दुसरे गडी त्यांच्या जागेवर येतात. पूर्ण खेळ पांढरा मिनिटांचा असतो. ह्या वेळेत जे जास्त गाडी बाद करतील तो संघ विजयी होतो. खेळताना जर नियम मोडले गेले तर ते फाऊल होते, ते फाऊल काढायचा असेल तर बसल्या गड्याला दोनदा खोखो म्हणावे लागते. दोन साइडला दोन अंपायर असतात. गडी खरच आऊट किंवा फाऊल झालं का ते बघत असतात आणि ते प्रत्येक सामन्याचे पॉइंट्स मोजत असतात आणि स्कोअर कार्डवर लिहिले जातात. 

Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment