ngsvarwade-15

व्यसन मुक्ति तंबाकू धूम्रपान वाईट सवय कशी सोडावी how to quite bad habits

 मित्रांनो,

     तुम्हाला काय वाटते एखादी वाईट सवय सोडणे खूप कठीण आहे का? ज्यांना त्यांची वाईट सवय सोडायची असते ते कधी या गोष्टीवर विचारच करत नाही. तुम्हाला जर का तुमची वाईट सवय सोडायची आहे तर तुम्ही एकदा विचार करून बघा, की या वाईट सवयीमुळे तुम्हा स्वतःवर आणि त्यामुळे तुमच्या परिवारावर त्याचा किती वाईट परिणाम होत आहे. जर का तुम्ही तुमची वाईट सवय सोडली तर तुमचे मन आधी पेक्षा किती प्रसन्न होईल, जे काही चांगले बदल होतील त्या बद्दल एकदा विचार करून बघा. तुम्हाला कोणती सवय कशी लागली याच्याशी माझा काही देणं घेणं नाही पण तुम्ही हा लेख वाचून तुमची वाईट सवय सोडण्यास तुम्हाला थोडेसे जरी प्रोत्साहन मिळाले तर माझ्या कामाबद्दल मला बरं वाटेल.कारण

प्रत्येकाला कोणतीही वाईट सवय लागल्यावर वाटते की ती एका लिमिट मध्ये राहावी पण ती लिमिट कधी क्रॉस होते हे आपल्याला माहीतच होत नाही. पण हजार लोकांमधून फक्त एकच व्यक्ती आपल्या सवयीला लिमिट मध्ये राखत असतो.

तुम्हाला माहिती आहे का कोणतीही सवय लागायला काय कारणीभूत असतो?

जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची सवय लागते, तेव्हा ती वस्तू मिळाल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये एक केमिकल रिलिज होतो. त्याचा नाव आहे डोपामाईन. हा डोपामाईन केमिकल जेव्हा आपल्या मेंदूत येतो तेव्हा आपल्याला आनंद झाल्याचा भास होतो. म्हणून तुम्हाला त्या वस्तूंमुळे आनंद होत आहे असे वाटते आणि आपल्या आनंदासाठी आपण ती वस्तू वारंवार मिळवण्याचा प्रयत्न करतो. क्षणभर मिळणाऱ्या आनंदासमोर त्यामुळे होणारे वाईट परिणाम आपण दुर्लक्षित करतो.


स्वतःशी संवाद साधा

जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची आठवण येईल तेव्हा तुमच्या मनाला त्रास होईल. तुमचा मन बेचैन होईल. तुमचा मनाला तुम्ही सावरा. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपले वाईट विचार त्याद्वारे बाहेर फेकून द्या. स्वतःला म्हणा वाईट सविचा परिणाम वाईटच होतो. काल मी अडाणी होतो पण आज मी शहाणा आहे. मी कुणाच्याही लोभात पडणार नाही. मोठ मोठे बिझिनेस त्यांच्या वस्तूंची सवय लावून लोकांच्या जीवाशी खेळतात. व फायदा त्या कंपनीला होतो. मी यांच्या मोहात पाडणार नाही. दुसऱ्यांच्या फायद्यासाठी स्वतःचा बळी देणार नाही. स्वतःवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षणाचा वापर करीन. जे भेटेल ते काम करत राहीन पण जास्तीचा टाईमपास करणार नाही. मला जीवनदान मिळाेला आहे. मी नासमज होतो पण आता मला समज आली आहे. शांततेचा अर्थ मला कळलेला आहे. 

Rate this article

Getting Info...