जसा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकास होऊ लागला तसा प्रसार मध्यमंचाही विस्तार वाढू लागला. सामाजिक संपर्क माध्यमे लोकांच्या हातात येऊ लागली. सर्व क्षेत्रांमध्ये एकमेकांत संपर्क जोडले गेले. महाजाळ्याच्या अस्तित्वाने प्रत्येकाला आपले नाव डिजिटली कोरण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या संकेतस्थळांचा उदय झाला. गूगल, याहू,फेसबुक, ट्विटर इत्यादी संकेतस्थळ आपले विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक माध्यम बनू लागले.

 आता जसा नवीन मोबाईल घेतला तसा सोशल मीडिया लोहचुंबकासारखी ओढते . कोणतीही सोशल मीडिया पोर्टल वापरताना त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे कारण कितीतरी वयोमनचे कितीतरी धर्माचे वेगवेगळ्या जागेचेवेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांचे विचार आपल्या वाटेला येत असतात. तेथे वाईट वागले तर तेथील तुमचे अस्तित्व धोक्यात पडू शकते म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे तुमची आयडी तुम्ही वापरत असलेला अकाउंट ब्लॉक होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चांगले काम केल्यास आपली ओळख जगासमोर प्रभावी बनण्यास मदत होते. चांगल्या विचारांची देवाण घेवाण केल्यास तुमच्या वरील विश्वास वाढत जातो. आणि तोच तुम्हाला स्वतःच्या कामाचा नफा मिळविण्यासाठी कारणीभूत असतो. पण एक सत्य असे ही आहे की सोशल मीडिया मुळे एक मुरखळही खूप मोठ्या महान माणसांशी तुलना केले जाऊ शकते. समजा एक माणूस थोडे वाईट विचार पसरवत आहे आणि ते त्यांच्यासारख्याच्या प्रवाहात जास्त पसंती मिळाली तर एखाद्या चांगल्याला कमी पसंती मिळले म्हणून गैरसमजच धोका असतो. 


 सोबत असलेल्या सोशल मीडिया मुळे संपूर्ण जगाचे दर्शन होते खरे पण त्यांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्यक्ष त्या जागी जावेच लागेल अन्यथा त्या जागेचा चव, गंध, स्पर्श, जात, धर्म,संस्कृती, अनुभवणे अश्यकच असणार आहे. त्याशिवाय तुम्ही जर बाहेरगावी गेलो असे स्टेटस ठेवणे तुमच्या राहत्या घरात चोरी होण्याची प्रमाण वाढवण्याचा संभावना असते. त्यामुळे सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईटही ठरू शकतो. हे ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Post a Comment