ngsvarwade-15

How to remove pimples/acnes naturally and permanently in Marathi? मुरूम कसे जातील?


 मित्रांनो,

 मला स्वतःला खूप दिवसापासून मुरुमंचा त्रास आहे, मी तुमच्यासोबत माझ्या अनुभवावरून खालील गोष्टी सांगू इच्छितो. तुम्ही जर कोणतीही क्रीम चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी वापरत असल्यास ती एक स्टिरॉइड क्रीम असते. त्यामुळे तात्पुरते मुरूम कमी झाल्यासारखे वाटतात, त्यामुळे तुम्ही जर ती स्टिरॉइड क्रीम अगोदर स्वतःहून लावलेली क्रीम बंद केल्यानंतर पुढील त्रास होतात.

 •  चेहऱ्याची आग होते
 •  चेहऱ्यावर खाज येते
 •  चेहरा काळा पडतो.
 •  चेहऱ्यावर उत येते.
 •  साबण सहन होत नाही.
 •  चेहऱ्याची त्वचा कोरडी पडते.
 •  मुरूम पण वाढतात.

 हे विसरू नका.

 1.  नख लावून त्यांना कधीच फोडू नका.
 2.  दिवसातून चार पाच वेळा चेहरा धुत रहा.
 3. जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका.
 4.  उन्हात बाहेर जाताना स्कार्प किंवा कॅप लावून जात जा. आभाळ असलं तरीही अन्यथा त्वचा काळी दिसते.
 5.  तुम्ही चेहऱ्याला कोणतं कापड लावता ते स्वच्छ व मुलायम असेल पाहिजे. उदा. रुमाल, टॉवेल ,उशी इत्यादी नियमीतपणे धुत रहा.

 काहीतरी कॉमेंट करून सांगा यार गेलेले मुरूम पुन्हा होतील असेच वाटते...........ते.

Rate this article

Getting Info...