ngsvarwade-15

डिजिटल युग : फायद्याचे की धोक्याचे


     हा कलयुग, स्पर्धेचा युग त्याचप्रमाणे डिजिटल युग आहे. जरा विचार कराल त्याच्यापेक्षा कतीतरी पट जास्त वेगाने जग बदलत चालले आहे. यामधे साधारण माणसाचा टिकाव लागणे कठीण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतत काहीना काही करत राहणे आवश्यक बनले आहे. तसे पाहता मानवजात पोटापाण्याचा विचार करता काहींना काही काम करत आहे. झाडाची फळं आणि कंदमुळे उपदून खाणे हेच ध्येय असताना जसे दिवस वाढत गेले गरजा वाढल्या भूक वाढली यामुळे अधिक उपाय शोधणे भाग पडले.आज आपल्याकडे जिज्ञासू माणसांनी शोध लावलेले नवनवीन उपकरणं आहेत. त्याच्या साहाय्याने गावातील लोक अंन धान्य मिळवण्यासाठी शेती करत आहेत कुणी जातीनुसार व्यवसाय करत आहेत. कुणी परंपरागत धंदा करत आहेत. कुणी शहरी शिक्षण घेऊन नौकरी करत आहेत. तर कुणी एखादी कला आत्मसात करून नवा रूपाला येत आहेत. यात प्रत्येक शेत्रात वावरणाऱ्या हर एकाला वाटते की त्यांना थोडा मोठा दर्जा / सन्मान मिळावा. म्हणून वाढत्या लोकसंख्येच्या गर्दीत पहिल्या नंबरच्या शिखरावर चढण्यासाठी सगळ्यांची धावपळ / स्पर्धा सुरू आहे.सध्या तरी काहीशा प्रमाणात कागदी व्यवहार असल्याने गावातील मंडळी काही वाईट आत्मीयता असलेल्या लोकांमुळे भ्रष्टाचाराला बळी पडतच आहेत. यावर आळा घालण्यासाठी आपल्याला डिजिटल युगात पाऊल टाकने अती महत्वाचे झाले आहे.


क्रमशः मायावी मोबाईल -ngsvarwade 

Rate this article

Getting Info...