ngsvarwade-15

consumerinfo mahadiscom in gogreen महावितरण वीज बिल कमी करण्यासाठी उपाययोजना महाऊर्जा

     नमस्कार मित्रांनो तुम्ही आज या पोस्टमध्ये आपल्या येणाऱ्या वीज बिल वरील रक्कम कसे कमी करायचे, कमी वीज युनिट जळतील यासाठी उपाय योजना व ऑनलाईन वीज बिल्ल भरण्याचे फायदे कोणते हे जाणून घेणार आहात.
     जर तुम्हालाही नक्कीच वाटत असेल की तुम्ही वापरत असलेल्या विद्युत वीज मीटरवर कमी वीज युनिट जळावे व आपला वीज बिल कमी येऊन आपल्या पैशाची बचत व्हावी तर हा लेख आपल्यासाठी खूप उपयोगी आहे त्यासाठी खाली वाचत चला.

1.  सौर ऊर्जा शक्तीचा वापर.

    जस जसा नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत आहे तसा त्याचा वापर करावा हे प्रत्येकाला वाटत असते, पण सगळेच लोक काही असे करत नाही. सौर ऊर्जा ही त्यातील एक आहे ही गोष्ट सगळ्यांना माहीत असली तरीही याचा वापर कमीच होत आहे पण जेव्हा गोष्ट पैशांवर येते तेव्हा वेगवेगळ्या उपायांची आठवण होते. त्यामुळे दर महिण्याला येणारा भरघोस वीज बिल जर वाचवायचा असेल तर तुम्हाला एक वेळ सौर ऊर्जेचे सामग्री लाऊन बिल भरण्याच्या चिंतेतून मुक्ती मिळवू शकता. ती सामग्री खालील प्रमाणे,
    

    अ) सोलर पॅनल

सोलर पॅनल हे प्लेट्स असतात जे सूर्यप्रकाश किरणे शोषून त्याचे विद्युतीय ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करतात. हे एक वेळ आपल्या छतावर लागल्याने आपल्याला काही पाहायचे कामच पडत नाही. 
    

    ब) सोलर चार्जर

सोलर चार्जर हा सोलर पॅनल कडून किरणांची रूपांतरित झालेली विद्युत ऊर्जेचे वहन करतो याला जोडले असलेल्या बॅटरी मध्ये साठवण्याचे / चार्जिंग करण्याचे काम  करतो.
    

    क) सोलर बॅटरी

सोलर बॅटरी ही सोलर पॅनल आणि चार्जर मुळे चार्जिंग होऊन ती ऊर्जा जास्तीत जास्त वेळ साठून ठेवते व जेव्हा गरज पडेल तेव्हा इत्यादींसाठी तेथील उपलब्ध उर्जेचा वापर करता येते.
    

    ड) सूर्य चूल

इलेक्ट्रिक शेगडीच्या वापरा ऐवजी आपल्याला सुधारित चूल किंवा सुर्य चूल याचा वापर करता येतो.
    

    इ) सौर उष्णजल यंत्र

जो काहीसा सोलर पॅनल सारखा पण याचा वापर पाणी तपवण्यासाठी केला जातो.
    

    फ) सौर दीप :  

सौर दीप म्हणजे ज्याला सौर यंत्रणा जोडलेली असते असे दिवे.


2.  एल. इ. डी, / सी. एफ. एल. चा वापर.

      तुम्ही सोर ऊर्जेचा वापर कराल पण जर अाधीपासुनचे जुने बल्ब वापरत असाल तर ऊर्जेची अधिकाधिक खपत होणार हे नक्की. 
 •       साध्या जुन्या बल्ब, लाईट एवजी नवीन वीज बचत करणारे एल. इ. डी. वापरा.
 •       एल. इ. डी. मुळे 80 % वीज  बचत होते.
 •       सी. एफ. एल. चा वापर केल्याने अधिक वीज वाचते.
 •       लाईट ट्यूब यांच्यावर धूळ साचू देऊ नका.
 •       मोठ्या खोलीत बाहेरचा सूर्यप्रकाशामुळे उजेड होण्याकडे लक्ष द्यावे.
 •       गरज नसताना वापर चालू ठेवण्यापेक्षा बंद करून ठेवावा.

3.  पंखे/ कूलर / एअर कंडीशनर वापरताना.

 •      पहली गोष्ट पंखे वेळोवेळी स्वच्छ करावेत कारण त्यांच्यावर धूळ साचलेली असते आणि पंखे जल होऊ शकतात व यामुळे त्यांची क्षमता कमी होते.
 •      काही लोकं अंघोळी नंतर केस असलेली पंख्यांचा वापर करतात ते उनात सुकवावे व फॅंनचा वापर टाळावा.
 •      इलेक्ट्रॉनिक रेगुलटर शकता कमी वापरल्यास ऊर्जेची बचत होत असते.
 •      उष्ण कोरडा हवामानात एअर कंडीशनर वापरण्यापेक्षा कुलरचा वापर करावा.
 •       महिन्यातून एकदा एअर फिल्टर साफ करावे.
 •       खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी आर्धतास आधी युनिट बंद करावे कारण थंडावा असतोच.
 •       जास्तीत जास्त गरम वा थंड  काहीही करण्यापेक्षा स्थिर असू द्या.

4. शेतात पंपासाठी वापर

    कित्येक शेतकरी शेतात पाणी वागवासाठी मोटर इलेक्ट्रिक आणि नवीन विद्युत जोडणी घेत असतात आणि महिन्याला त्याचे बिल भरतात त्यापेक्षा आपल्या शेतातही सौर ऊर्जेचा वापर करता येतो.
 •     म्हणून स्टार मानांकित पंपाची खरेदी करायला पाहिजे.
 •     पंप निवडताना चांगला पंप निवडा.
 •     मोटर ला संयुक्तिक असा स्टार्टर बसवा.
 •     पीव्हीसी पाईप तसेच अल्प रोधनाचा वल्हव वापरावा.
 •     पंप प्रणालीतील जल गळती टाळा.
 •     ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल कंट्रोलच्या वापर करावा.
 •     मार्क चे योग्य क्षमतेचे शन्य कॅपॅसिटर बस्वा.
 •     पंप सेत नियमित लूब्रिकेट करा.
 •     शक्यतो पंप विजेच्या उच्चतम वीज मागणी च्या वेळी वापरणे टाळा.

5.  मोबाईल नंबर/ ईमेल लिंक : 

         आपले मोबाईल नांबर आपल्या वीज बीला सोबत लिंक करू शकता ज्याने आपल्या मीटर ची रीडिंग किती झाली कधी झाली किती बिल येणार हे तुम्हाला मेसेज आल्यावर कळणार तर तुमचा मोबाईल नंबर जोडण्यासाठी तुमच्या मोबाईल वरून फक्त एक एसएमएस करायचा आहे, तो असा [ MREG (तुमचा १२ अंकी ग्राहक क्र.) आणि 9225592255 ह्या नंबरवर पाठवायचा आहे.
    आपला जोडला गेलेला मोबाईल नंबर किवा ईमेल आयडी चुकीचा असेल तर तुम्ही www.mahadiscom.in वर भेट देऊन दुरुस्त करू शकता.6. ई - बिलासाठी नोंदणी : 

      विद्युत बिल छापील कागदी बिलाऐवजी ते थेट ईमेल आयडी वरती वीज बिल मिळवन्यासाठी नोंदणी करा याचे फायदे म्हणजे एक कागदांची बचत होईल आणि झाडे वाचतील व दुसरे म्हणजे प्रत्येक ई - बिलवर १०रुपयांचा गो ग्रीन डिस्काउंट मिळेल. म्हणजे म्हणजे कागदी बिल न पाठवता आपल्याला ई मेल वर बिल पाठवला जाईल त्यामध्ये तुम्हाला त्याबिलवर १० रुपयांची कपात झालेली दिसेल.

अ) गो ग्रीन रजिस्ट्रेशन : 

गो ग्रीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा. https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen/php येथे गेल्यानंतर तुम्हाला सध्या म्हणजे आत्त आलेल्या छापील बिलवरील GGN नंबर जो वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात असतो तो टाकावा लागतो. त्यानंतर  तुम्हाला एक कन्फर्माशन ईमेल येईल.7.  ऑनलाईन वीज बिल पेमेंट

     अ) ऍप / वेबसाईट वरील डिस्काउंट ऑफर

दर महिन्याला इंटरनेट वर वेगवेगळ्या ऍप, वेबसाईट मध्ये तुमचे 50, 500, 1000, 2000 वाचू शकतील असे कितीतरी रिचार्ज कूपन , बिल पेमेंट ऑफर असतात त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो.

     ब) महावितरण कडून विशेष सुट

जे लोक आपले बिल बँकेतच जाऊन भेरतात त्यांना हे माहीत नाही की आपण जर ऑनलाईन बिल भरले तर कोणत्याही ऑफर्शिवय 0.25 % एवढा सूट डिस्काउंट मिळतो. उदाहरणार्थ, समजा तुमचे जास्तीत जास्त बिल २०००० रुपये आले तर त्याचे भुगतान तुम्ही ऑनलाईन केले तर त्या बिलामागे तुम्हाला सुमारे 500 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. आणि जर वेगवेगळे ऑफर्स  मिळत असतील तर ते वेगळेच होतील.
     
     जर तुम्हाला ऑनलाईन बिल कसे भरतात हे माहीत नसेल तर तुम्ही ही पोस्ट वाचून पाहू शकता, 

8. थकित / विलंब / तत्पर भरणा :

 प्रत्येक महिन्याला येणारा विजेचा बिल  हा बिल आल्याच्या दिनांकापासून ८ किंवा ९ दिवसांत भरणा केल्यास जो काही दिवस गेल्यावर लागणारं विलंब आकार २०, ५० रुपये असतो तो लगेच बिल भरल्याने द्यावा लागत नाही वरून तत्पर देयक भरणा महणून काही पैशांची बचतही होते.

हा लेख पूर्ण वाचल्याबाबत धन्यवाद, काही शंका असतील तर कॉमेंट करू शकता.

Rate this article

Getting Info...