आम्ही आज आपल्यासमोर प्रस्तूत करत आहेत लग्न पत्रिकेत वापरले जाणारे काही उखाणे जे साधारणतः आमच्याकडे वापरले जातात. ण तुम्ही वाचून आपणही आपल्या कडच्या पत्रिके मधे अशाप्रकारे लिहिले जातात का ते तुम्ही कॉमेंट मधे सांगू शकता. 


माहेर सोडून सासरी गेली,
वडिलांची लेक परकी झाली,
बहीण भावाची आशा संपली,
कुमरे परिवाराची मुलगी होती
आचले परिवाराची सून झाली.एक नाजूक धागा... नातं प्रेमाचं, त्यात गुंफले मनी...
गुंफण विश्वासाचं, मध्यभागी दोरलं...
त्यातून तयार होत मंगळसूत्र,
जे असतं अखंड लेंन सौभाग्याचं,
आग्रहाचं निमंत्रण ____ परिवाराचं...
अतूट रेशमीबंध जोडुनी | अाशिर्वादित होण्याकरिता |
दाम्पत्य सूत्र स्विकारूनी | समारोह हा रचला खास |
सनई चौघड्याचा मंजुळणाद | हर्शभरीत स्वरांची घालुनी साद |
मनोमिलनाच्या उत्सवाकरिता
सादर निमंत्रण धाडतो आम्ही आज.

आयुष्याच्या वेलीवर हळुवार पांन..
म्हटले तर दोन जीवांना जोडणारा प्रेमाचा धागा...!
म्हटले तर दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध...!
सात जन्माची गाठी जुळवणारा हा सोहळा...!
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादानशिवाय
अपूर्णच म्हणूनच.. या मंगल प्रसंगी
आपली उपस्थिती हवीच...!

मेघांनी आनंद कण वर्षावे.
इंद्रधनुनी सप्तरंगी द्यावी.
वसुंधरेने धैर्य द्यावे,
आभाळाणे छत्र धरावे,
आणि वधू वराचे अवघे
जीवन सुखी व्हावे
असे आशिर्वाद कायमचे द्यावे.
हेच ____ परिवाराचे
आग्रहाचे निमंत्रण समजावे.

आमचे येथे ईश्वर कृपेने
 सोबत दर्शविलेल्या
मंगल कार्यास उपस्थित राहून
वधू वरास शुभाशीर्वाद द्यावे,
ही विनंती.

माती मधून निघतो मोती,
सर्व काही जगांन्नाथाच्या हाती,
तोच जुळवितो नाती - गोती,
तेव्हाच मिळतो जीवन साथी.
आपण यावे लग्न समारंभाला,
ही विनंती ____ परिवाराची.

नवयुगाच्या शितल प्रकशात,
पवित्र संस्काराच्या दिव्य मार्गावर,
दोन हृदय एकत्र होऊन गृहस्थाश्रमात
पदार्पण करीत असलेल्या नवोदित
वधू वरास आपल्या आशीर्वादाने
उपकृत करावे ही विनंती.


प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श,
आपुलकीचे मन, कौतुकाची शाप,
मधुर हास्य, मनात कोरलेल्या भावना,
हृदयस्पर्शी जिव्हाळा असलेला
हाऋणानुबंधाचा मंगल सोहळा
आपल्या भावनास्पर्शाने संपन्न
होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण...

शब्द जरीअबोल असले
तरी पत्र एक भाषा आहे,
लग्नाला याल अशी
___ परिवाराची आशा आहे.


सोनेरी किरणांच्या हस्तांनी,
पावित्र मेहंदीच्या पावलांनी,
घेऊन साथ संगत सुखाची,
अखंड प्रेमाची आणि गृहसमृद्धीची
ती घटिका असेल मांगल्याची,
प्रतिक्षा आपल्या आगमनाची...


क्षणभर भेट आयुष्यभराची मैत्री ठरावी,
क्षणाच्या मंगल मुहूर्ताने आयुष्यभर नाती जुळावी,
तसेच क्षणभराच्या आपल्या उपस्थितीने..
वधूवरांना मंगलमय आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद मिळावेत
यासाठी या शुभविवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण..!


प्रेमाला असते विश्वासाची साथ,
कळीला असते फुलण्याची वाट,
तसेच दोन जुळत्या मनाला असते
एकत्र जगण्याची आस म्हणून
____ परिवारात उपस्थित राहून बांधा
____ व ____ यांची जन्मठेपेची गाठ...!

अक्षधांची उधळण, मांगल्याचा क्षण,
दोन घराण्याचा संगम, संसार ससीतेचा उगम,
दोन परिवाराचे मंगलमय मिलन,
आपण सहपरिवार लग्नाला यावे हेच
मडावी परिवाराचे आग्रहाचे निमंत्रण...

दोन जीवांच्या स्वप्नाची परिपूर्ती करणाऱ्या
या पवित्र संस्कार सोहळ्यास
आपण सहपरिवार उपस्थित राहून
आशिर्वाद द्यावेत ही आग्रहाची विनंती.

पाऊस क्षणाचा, पण गारवा कायमचा...
मैत्री दोन जीवाची, मंगल सोहळा एक दिवसाचा...
भेट क्षणाची, पण आशिर्वाद महत्वाचा...
म्हणूनच आपले येणे महत्त्वाचे,
करिता आग्रहाचे निमंत्रण ____ परिवाराचे...!

वेल बहरली प्रितीची, फुले लागली प्रेमाची |
दोन जीवांचे मिलन झाले, जुळती नाती दोन घरांची ||
ही कृपा श्री गणेशाची, कृपा करावी येण्याची |
पडावे तुमचे पवित्र पाऊल लग्न मंडपी,
ही विनंती ____ परिवाराची....!

लक्ष्मीच्या पावलांनी मेहंदीच्या हाताने,
कुलदेवतेच्या साक्षिने, सप्तपदीच्या पवित्र बंधनाने,
गृहास्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या
नव दांपत्यास शुभाशिर्वाद देण्यासाठी
........... परिवाराचे आगत्याचे निमंत्रण.पाण्यात शोभा कमळाची,

आकाशाला शोभा चांदण्याची,

मंडपाला शोभा पाहुण्याची,

गाठ सात जन्माची,

बाग बहरली सात जन्माची,

लग्नाला यावे आशीर्वाद देण्यासाठी

हीच विनंती ____ परिवाराची. 

 

सप्तपदीची सात पावलं,

गुंफल्या नात्याच्या गाठी

यायलाच हवंय तुम्हाला,

वधू- वरास आशीर्वाद देण्यासाठी

हीच विनंती आपणास,

____ परिवाराची....!

शांत चंद्राची अपार माया जगावरी

थोर नी यावे शुभविवाह प्रसंगी

आमच्या येथे कुटुंबसहीत तसेच 

इश्टमित्र परिवारासह येऊन

वधू वरास शुभा शिर्वाद द्यावा,

ही विनंती ____ परिवाराची.


हिमालयातून निघाली गंगा,

गंगेचे निर्मळ पाणी,

आठवण येते क्षणोक्षणी,

पंख नाही दिले देवानी,

म्हणून निमंत्रण पाठवत आहे पत्रिकेनी,

होतील कश्ट तरी सहन करून यावे लग्नाला,

चुकून सांगू नका पत्रिका नव्हती आम्हाला.


मुर्तिविना मंदिर सूने,

पंखावीणा पाखरू,

तुम्हावीणा मंडप सूने,

येण्यास नका विसरु काय

चमत्कार कोण कोणाजवळ येतो

तिथे ज्यांचे भाग्य असते

तिथेच त्यांचा विवाह होतो.

वेलीने बहरावे कलीसाठी,

कळीने फुलावे फुलासाठी,

फुलाने उमलावे प्रेमासाठी,

लग्नाला यावे आशीर्वाद देण्यासाठी,

हीच आग्रहाची विनंती ___ परिवाराची आपणासाठी.

रेश्माला असते मुलेमतेची साथ...!

कळीला असते फुलांची आस,

दोन जुळत्या मनाला असते एकत्र येऊन जगण्याची आस

म्हणून ___ परिवारात उपस्थित राहून बांधा __ आणि __ ची गाठ

तुळशीच्या झाडाखाली मूर्ती शोभे विठ्ठल रुखमाईची,

आकाशात जोडी शोभे चंद्र ताऱ्यांची,

तशी जोडी शोभे मंडपात __-__ यांची,

सुख-दुख:त साथ लाभो आपल्या आशीर्वादाची,

म्हणून आग्रहाची विनंती ___ परिवाराची.

मंगल जीवनातील एक अनमोल क्षण, 

दोन घराण्यातील ऋणानुबंध जोडणारा चिरस्मरणीय योग,

या मंगल क्षणी सहपरिवार इश्टमित्रासह उपस्थित राहून

वधु वरास आशीर्वाद द्यावा, हीच आग्रहाची विनंती.

नवरीच्या हातात नवरदेवाचा हात, दोघांनी बांधली सात जनमाची गाठ,

_____-____ साथ, सुरू होत आहे दोघांच्या आयुष्याची सोनेरी पहाट,

पाहुण्यांनी लन मंडपी येण्याची कृपा करावी...

दोघेही पहात आहेत अशिर्वादाची वाट....

आई गाळू नको अश्रू, कन्या ही सासरी निघाली,

बाबा ल नका तुम्ही, माया ही अजून नाही सुटली.

दादा निरोप तुजला, मी झाली रे पाहुनी.

माझेच घर मला झाले परकी, नवीन नात्यात गुंफुनी..!
प्रथम पूजा एका भगवंताची,
धन्य ती भारतीय संस्कृती,
सेवकाच्या हाती धरतीची गती,
बाबाने लावल्या प्रकाशाच्या ज्योती,
सेवकाच्या रथावर बाबा सारथी,
होऊन गेले महारथी,
मातीतून निघाले मोती,
सर्व सेवकाच्या हाती,
तोच गुंतवितो नाती गोती,
तेव्हाच मिळतो जीवनसाथी,
हीच निमंत्रण पत्रिका तुमच्या हाती...
सनईच मंजुळ स्वरात मंत्राच्या घोषात

नवदाम्पत्य वैवाहिक जीवनात पदार्पण करीत आहोत

या मंगल सोहळ्यात आशिर्वादाचे सुमने उधळण्यासाठी

सस्नेहाने __ परिवार आमंत्रित करीत आहे.

हे सुध्दा वाचा,

Post a Comment

  1. आग्रहाचे निमंत्रण 🙏

    ReplyDelete