नमस्कार,
  यामध्ये मी तुमच्या सोबत माझा अनुभव सामायिक करत आहे जे मी कारोना व्हायरस मूळे लॉक डाऊन च्या काळात घडून आलेले आहे. हे तुम्ही तुमच्या समजुती नुसार समजू शकता किंवा आपल्याला काय वाटते याबद्दल आपण कॉमेंट करू शकता. 

लॉकडाऊन च्या आधीची परिस्थिती :


     लॉकडाउन सुरु व्हायच्या होता त्याच्या आधी माझी तब्येत बरोबर नव्हती उपचारासाठी मी नागपुर ला गेलो होतो. मग मला कोरोनाची लक्षणे आढळून आली जी फार कमी प्रमाणात होती मी गावाकडे आलो होतो. आणि आपण कोरोना बाधित माणसाच्या संक्रमनातुन आलो आहे असं मला वाटायला लागला. मी सरकारी दवाखान्यात गेलो, तिथे फक्त दोन तीन दिवसच क्वारंटाईन मध्ये राहिले आणि मी मग घरी आलो.लॉकडाउन सुरू झाल्यानंतरचा हाल,


     गावात ग्राम पंचायतीच्या ठिकाणी स्पीकर लावण्यात आले होते जेथून कोरोनाच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी सल्ले दिले जात होते. पण ते आमच्या घराजवळच असल्यामुळे ध्वनी प्रदूषणासारखेही वाटत होतं, एक बरं झालं ते वायू प्रदूषण खूप आटोक्यात आले ते, हळूहळू माझ्यातली कोरोनाची लक्षणे नाहीशी झाली कारण तसे जुन्या गोळ्यांच्या साईड इफेक्टने झाले होते हे माझ्या लक्षात आले, आणि हा विचार मला दुसऱ्या गोळ्या खाण्यासाठी अडथळा आणत. पण कोरोनाचा पसार थांबवण्यासाठी गावात साबण आणि मास्क वाटली गेेली. मग काय प्रत्येक वेळी साबणाने हात स्वच्छ करणे, दररोज मास्क लावणे, दुसऱ्या लोकांपासून, प्रान्यांपासून दूर राहने,  रोगप्रतिकरकशक्ती वाढिण्याकरिता गरम काढा करून पेने इत्यादी. उपाययोजना सुरू झाल्या. पण  ह्या लॉक लॉकडाउनमुळे गावातही गमेनासा झालाय ।लॉकडाउनमध्ये मन रमावण्यासाठी,


   सकाळी उठल्यापासून जेवण झाल्यानंतर के करावे हे काही कळत नाही, मग आपण आपल्या घरच्याघरी आपले बोर्ड गेम्स खेळत होतो, उदा. संगम, चोआ अष्टा, सोळा गोटी, चेस, कॅरम, इत्यादी ।
   
   टीव्ही : सगळ्यांच्या घरात टीव्ही तर सतत चालू असते पण आम्ही बघण्याचा कालावधी मर्यादित करण्यासाठी दुपारी एक चित्रपट बघायचो आणि संध्याकाळच्या बातम्या ।
   
   मोबाईल : दुपारनंतर चार,पाच वाजताच्या सुमारास  सायंकाळच्या वेळेस मोबाइल हाताळावा असा वाटतो.
   
   पुस्तक : रात्रीचे जेवण केल्यानंतर झोप येतपर्यंत आपले  जुने पुस्तक आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करतोय.

   आता अशी परिस्थिती आहे की लॉकडाउन समोर वाढेल की थांबेल हे माहीत नाही.


धन्यवाद.

Post a Comment