ngsvarwade-15

पेटीएम ॲप पेटीएम वॉलेट, पेटीएम बँक, रिचार्ज, बिल पेमेंट.

पेटीएम ॲप


पेटीएम ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी,


       तुमच्या मोबाईलवर पेटीएम ॲप डाऊनलोड केलेले नसल्यास तेेे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करून घ्या जर अपडेट नसल्यास अपग्रेट करून घ्या.


पेटीएम ॲप्स ची भाषा मराठी मध्ये बदलण्यासाठी,


       पेटीएम ॲप्स इन्स्टॉल झाल्यावर सर्वात आधी त्याची भाषा इंग्रजी मधून मराठी मध्ये बदला,
पेटीएम ॲप ची भाषा बदलण्यासाठी त्या ॲप मध्ये वरती डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील त्यांना दाबल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्या पर्यायांपैकी choose language वर टच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा दिसतील तेथे मराठी सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू वर टच करायचं आहे त्यानंतर तुमच्या पेटीएम ॲप्स ची भाषा इंग्रजी मधून मराठी झालेली दिसेल.

पेटीएम ॲप मधून विज बिल भरण्यासाठी,

    पेटीएम वर विज बिल भरण्यासाठी पेटीएम उघडल्यानंतर तुम्हाला अशा 
 प्रकारचा एक चिन्ह दिसेल, त्याला टच केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे इंटरफेस दिसेल,


 तेथेे तुम्हाला तुमचा राज्य तेथे टच करून निवडायचा आहे तुमचा  मंडळ जसे की महावितरण सिलेक्ट करायचा आहे नंतर बिलिंग युनिट आणि ग्राहक क्रमांक आपल्याला त्यात टाकायचा आहे जर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट माहित नाही आहे तर खाली दिलेह्या पद्धतीने शोधा,

तुमच्या बिलाची रक्कम तेथे चेक केल्यांनतर पुढे चला आणि सुरू ठेवा वर टच करा, 
मग तुम्हाला तेथे वेगवेगळे पेमेंट पद्धती दिसतील.
जसे की,
  1. क्रेडिट कार्ड,
  2.  डेबिट कार्ड,
  3.  भिम युपीआय,
  4.  इंटरनेट बँकिंग इत्यादी 

      त्यातील कोणतीही एक पद्धत ज्याने तुम्हाला तुमच्या बिलाची रक्कम त्वरित देऊन टाकायची आहे ते निवडावे, जर तुम्हाला एटीएम कार्ड ने बिल भरायचा असेल तर त्यातील डेबिट कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्डचा नंबर, त्यातील एक्सपायरी डेट/व्यालिडीटी ची तारीख आणि cvv म्हणजे तुमच्या एटीएम कार्ड च्या मागच्या बाजूचे आखरी चे तीन अंक
तेथे लिहायचे आहेत.

      त्यानंतर paynow वर क्लिक करून मग तुम्हाला एक ओटीपी येईल ते ओटीपी टाकल्यानंतर make payment वर क्लिक केल्यानंतर तुमचं बिल भरणे पूर्ण होईल, मग तुमच्या मोबाईलवर तुमच्या बॅंकेतून केवढी रक्कम कापण्यात आली आणि बिल भरणे यशस्वी झालं याबद्दल मेसेज येतील.जर कोणती अडचण आली तर कमेंट करून सांगा,
धन्यवाद.


हे सुध्दा वाचा,
  1. उपयोगी मोबाईल फोन च्या टिप्स.
  2. कम्प्युटर विजन सिंड्रोम काय आहे?
  3. तुम्हाला आवडतील अशा इंटरनेट टिप्स.

Rate this article

Getting Info...