आत्ताचे जग हे किती वेगाने बदलत आहे हे सगळ्यांना माहीतच आहे, पण या डिजिटली बदलणाऱ्या युगात किती लोक डिजिटल झाले याचा आढावा कोणीच घेत नाही आहेत. आपल्या भारत देशामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना पैशाचा ऑनलाइन व्यवहार करता येत नाही. जेव्हा नोटबंदी झाले होते तेव्हा सगळ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला होता, जर त्याच्या पहिल्यापासूनच सवय लोक डिजिटल पैशाची व्यवस्था करत असते तर त्यांना तेवढा त्रास झाला नसता. चला तर आता आपण काहीतरी शिकून घेऊ या.

     आता आपण सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल पाहतो तरी बहुतेकशे लोक जुने बटन वाले मोबाईलच वापरतात, त्यांनाही इलाज म्हणून आणि इंटरनेट नसलेल्या अँड्रॉइड पिढीला सांगायचं म्हणून खाली थोडीशी माहिती दिली आहे ज्याने तुम्ही इंटरनेट नसताना कोणते मोबाईल पैशाचे व्यवहार करू शकता,

    तुम्हाला सगळ्यात पहिले जो मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबर वरून  *९९#  ह्या क्रमांकावर फोन करायचा आहे.

त्या ओके वर टॅप करा आणि थोडं थांबा, आता तुमच्या मोबाईल वर दुसरा नवीन विंडो खाली दाखवल्याप्रमाणे ओपन होईल,

    मग तिथे तुम्हाला हेेे सगळे एकदाच व्यवहार सुरुवात करण्यासाठी एकदा तुमच्या बँकेचा नाव किंवा तुमच्या बँकेच्या आय एफ एस सी कोड चे पहिले चार अक्षर लिहावे लागतील त्याच्यानंतर सेंड वर टॅप करायचा आहे, त्याच्या नंतर तिथे तुमची बँक दिसेल त्यां बँक समोरील नंबर (1) टाईप करून सेंड वर टॅप करा खाली दाखवल्याप्रमाणे तुमची बँक वेगळी राहू शकते.

   ह्याच्या नंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला काय करायचा आहे हे निवडावं लागेल.
पण मला वाटतं की तुम्ही पहिले यु पी आय पिन तयार करा तुमच्या एटीएम चा नंबर टाकूनही तुम्ही करू शकता.
     इथे तुम्ही पैसे पाठवू शकता, रिक्वेस्ट करू शकता, किती पैसे आहेत ते बघू शकता व्यवहार बघू शकता.
   जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर 1 नंबर टाकून सेंड वर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे दिसेल.
     ह्यामध्येे तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याला कशाने पाठवायचे आहे हे निवडावा लागेल.  आणि नंतर त्याच्या बद्दल तपशील टाकून मग पैसे किती ते टाकून सेंड वर टॅप करायचा आहे. आणि मग तात्काळ तुमचा व्यवहार पूर्ण होईल.


         तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत, शेअर करा कमेंट करा.
धन्यवाद.

Post a Comment