नमस्कार, मी एनजीएस वरवाडे आपले स्वागत करतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या उन्हाळी किंवा हिवाळी परीक्षेचा वेळापत्रक, जुन्या प्रश्न-पत्रिका, हॉल तिकीट, सूचना पत्रक, निकाल इत्यादी बघण्यासाठी तुम्हाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अधिकृत संकेस्थळ वर जावे लागेल आणि मग तुम्हाला पीडीएफ फाईल डाउनलोड करता येईल तर ती डाउनलोड कशी करायची आणि ती वेबसाइट कोणती आहे हे खाली दिले आहेत,

gondwana university gadchiroli
जर तुम्ही मोबाईल वरून डाउनलोड कण्यासाठी बघत असाल तर खालची वेबसाइट ही मोबाईल साठी आहे.
जर तुम्ही संगणकावर बघण्याचा प्रयत्न करत आहात तर ही संगणकास वेबसाईट आहे पण मोबाईल वरसुद्दा सुरू होते.
सविस्तर,
तुम्ही https://gondwanauniv.emdoar.com/ ही वेबसाईट ब्राऊझर मध्ये टाकल्या नंतर तुम्हाला त्या वेबसाइट वर Examination नावाचा टॅब दिसेल त्याच्यावर एक क्लिक करायची आहे, त्यानंतर तिथेच त्याच्या खाली तुम्हाला एक ड्रापडाऊन मेनू येऊन दिसेल तिथे तुम्हाला टाइमटेबल बघायचा किवा डाउनलोड करायचं असल्यास timetable वर क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर तुमच्यासमोर टाइमटेबल लिस्ट असलेला एक पेज ओपन होईल, आपल्याला तिथून टाइमटेबल लिस्टचच्या सगळ्यात खाली तुम्हाला कोणत्या वर्षीचा टाइमटेबल हवा आहे तो निवडायचा आहे,जसे winter/summer 2020 मग तुम्हाला बाजूला लिस्ट दिसेल प्रत्येक फॅकल्टी आणि सेमस्टर नुसार तुम्हाला ज्या फॅकल्टी चा पाहिजे त्याच्या समोर सेन्मेस्टर बघून download क्लिक करा म्हणजे तुमचा टाइम टेबल डाउनलोड होईल आणि तो pdf फाईल असेल.
STUDENT LOGIN
तुमचा PRN नंबर उदा. १२३४५६७७८९०
तुमच्या डॉक्युमेंट्स वरील आईचा नाव कॅपिटल अक्षरात PASSWORD म्हणून टाकावा.
उदा. SHANTABAI
आणि लॉगिन बटणावर क्लिक करावे.
आणि तुम्हाला काय पाहिजे ते निवडावे.
Online Exam :-
तुम्ही तुमच्या कॉलेज मध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे त्यामोबाईल नंबरवरती एक असा मेसेज येईल.
![]() |
त्यामध्ये username हा तुमचा PRN नंबर असेेल आणि password हा तुमचा मोबाईल नंबर असेल.
दिलेली लिंक ऑनलाईन एक्साम साठी : https://unigug.examlive.org
ह्या लिंकवर जाऊन एसएमएस मध्ये दिल्याप्रमाणे username व password टाकून तुम्ही ऑनलाईन एक्साम देऊ शकता.
फायनल एक्साम च्या दिवसा आधी ऑनलाईन पद्धत समजून घेण्यासाठी mock test असते. यामुळे फायनल एक्साम कशी असणार याची माहिती होते. Mock टेस्ट चा काहीही फरक पडत नाही.
परीक्षेच्या दिवशी वेळापत्रकानुसार योग्य त्या वेळेवर लॉगिन करा आणि एक्साम द्या.
माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.
Thanks.
https://www.examslive.org/unigug-results/
ReplyDelete